राज्यात ६७५ नवीन रुग्ण
@maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी १०४ ओमीक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाल्याने कोरोना रुग्णांच्या तुलनेत ओमीक्रॉन रुग्णांचे पारडे जड झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, गेल्या तीन दिवसानंतर राज्यात ओमीक्रॉन रुग्णांची (omicron patients) नोंद करण्यात आली. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (NIV) यांनी रिपोर्ट केले असून या १०४ रुग्णात पुणे मनपा ४१, औरंगाबाद १४, सिंधुदुर्ग १२, मुंबई ११ तर जालना आणि नवी मुंबई ८ प्रत्येकी, ठाणे मनपा ५, मिरा भाईंदर – ३, सातारा – २ असे आजपर्यंत राज्यात एकूण ४७३३ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
यापैकी ४५०९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome sequencing) पाठवण्यात आले. त्यापैकी ८४०७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९७५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
राज्यात मंगळवारी ६७५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,६६,३८० झाली आहे. काल १२२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१२,५६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०४ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६१०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात मंगळवारी ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७९,४०,९२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६६,३८० (१०.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,३१,४१२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत ७७ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ७७ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५५६३१ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६९१ एवढी झाली आहे.