@maharashtracity

एका दिवसात ८२ टक्के रुग्णवाढ

मुंबई: मुंबईत मंगळवारी १३७७ नवीन कोरानाबाधित रुग्ण (corona patients) आढळले. तर बुधवारी २५१० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. म्हणजेच गेल्या २४ तासात मुंबईत (Mumbai) ११३३ रुग्णांची भर पडली असल्याचे समोर आले. यानुसार, दिवसभरात ८२ टक्के वाढ झाली असल्याचे समोर येत आहे.

मुंबईत आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७,७५,८०८ एवढी झाली आहे. तर बुधवारी २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत ७,४८,७८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ८०६० इतकी झाली आहे. ६ डिसेंबरपासून मुंबईतील रुग्णसंख्या १८८ टक्के वाढली आहे. रुग्ण बरे व्हायचा दर नवीन रुग्णांच्या केवळ १० टक्के आहे. दररोज सरासरी २०० ते २५० रुग्ण बरे होत आहेत. मात्र बाधित रुग्णांची संख्या २५१० वर गेली आहे.

आठवड्याभरात ७०५८ नवीन रुग्ण सापडले असतांना केवळ १७९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. दरम्यान बाधित रुग्ण वाढत असले तरी मृत्यू नियंत्रणात आहेत.

बुधवारी एका कोविड बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा १६,३७५ वर पोचला आहे. मात्र गेल्या आठवड्याभरात १० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारी सांगते. तसेच २२ आणि २५ डिसेंबर रोजी शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मुंबईत बरे झालेल्या रूग्णांचा दर ९७ टक्के असून कोविड वाढीचा दर ०.१० टक्के झाला आहे. आज दिवसभरात ५१,८४३ कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत १,३५,७६,४५३ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आणखीन कमी होऊन ६८२ दिवस झाला आहे. परिणामी कोरोना वाढीचा दर देखील वाढला असून ०.१० इतका झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here