@maharashtracity

मुंबई: राज्यात बुधवारी ११९३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१४,१५८ झाली आहे. आज १,५१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५५,१०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १५,११९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात बुधवारी ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या (corona patients) मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२९,४७,३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१४,१५८ (१०.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Also Read: भाऊबीजेसाठी बेस्टच्या १३६ जादा बसगाड्या

सध्या राज्यात १,८७,२८६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर ८९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३१९

मुंबईत दिवसभरात ३१९ नव्या कोरोना रुग्णांची (corona patients in Mumbai) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५७५५१ एवढी झाली आहे. तर ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६२५९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

४ दिवस लसीकरण बंद

मुंबईतील सरकारी व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर (vaccination centres) गुरुवार दिनांक ४ नोव्हेंबर ते रविवार दिनांक ७ नोव्हेंबर असे चार दिवस लसीकरण बंद राहणार आहे. सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी लसीकरण पूर्ववत सुरु होणार आहे. महानगरपालिकेकडे (BMC) कोविड लसीचा (covid vaccine) पुरेसा साठा उपलब्ध असून मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here