@maharashtracity

मुंबई: देशात तिसऱ्या लाटेची भिती आणि ओमिक्रॉन (omicron) वेरियंटची रुग्ण संख्या पाहता राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, दादर येथील लाल पॅथ लॅबमधील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मुंबई महानगरपालिकेने ती पॅथ लॅब (Path Lab) सील केली आहे. एकाच लॅबमध्ये १२ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दादर पश्चिमेला असलेल्या लाल पॅथ लॅबमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महापालिकेने (BMC) त्याच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांची कोविड चाचणी (covid test) केली. तसा तपास केल्यावर १२ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आल्याने ती लॅब सील करावी लागली असल्याचे जी नॉर्थ सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here