@maharashtracity

महाड (रायगड): दासगाव परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या दोन दिवसात रस्त्यावरून चालणाऱ्या १२ लोकांवर कुत्र्यांनी (dog bite) हल्ला करत चावा घेतला आहे.

गेल्या काही दिवसापासून दासगाव परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत माजवली आहे. हा कुत्रा गाव परिसरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावत समोर येणाऱ्या व्यक्तीवर हल्ला चढवत आहे. गावातील अनेक लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाती लागला नाही.

या कुत्र्याने काही घरात देखील शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण दासगावमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसात सागर सुरेश चव्हाण, अमित गणपत मनवे, रमेश महातो, मिथुन कर्जावकर, यशवंत वांद्रे, अनंत सीताराम वाडकर, समीक्षा चंद्रकांत जाधव, दीपक कृष्णा पवार, बेचन बिचू कर्मा, मुश्ताक अब्दूल कादिर अनवारे, गुलजार बावडेकर, महमद कलाम, सर्व राहणार दासगाव या १२ लोकांना कुत्र्याने हल्ला करत चावा घेतला आहे. या सर्व लोकांवर दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (PHC) उपचार करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here