@maharashtracity

मुंबईत कोरोनाच्या (corona in Mumbai) कालावधीत १० सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थीदिनी (Ganesh Chaturthi) विघ्नहर्ता गणेशाचे आगमन होत आहे. गणेशोत्सव (Ganesh Festival) साधेपणाने साजरा करण्याबाबत राज्य सरकार, मुंबई महापालिकेने (BMC) आवाहन केले आहे. मात्र गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व गणेश मंडपासाठी पोलिसांसह पालिकेची परवानगी अत्यावश्यक असते. त्यानुसार पालिकेकडे ३ हजार ५२० मंडळांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र आतापर्यंत १ हजार ९९६ मंडळांना परवानगी मिळाली आहे.

तर ३८१ मंडळांना आतापर्यंत विविध कारणांस्तव परवानगी नाकारली आहे. १४३ अर्ज प्रक्रियेत आहेत. यासंदर्भातील माहिती गणेशोत्सवाची जबाबदारी असलेले परिमंडळ – २ चे उपायुक्त हर्षद काळे यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना दिली आहे.

काही मंडळांच्या अर्जात काही चुका आहेत तर काही मंडळांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अशा विविध कारणास्तव सदर मंडळांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती हर्षद काळे यांनी दिली.

मुंबईत अद्यापही कोरोनाची दुसरी लाट सुरू असून तिसरी लाट (third wave of corona) उंबरठ्यावर आली आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी म्हटले आहे. मात्र गणेशोत्सव कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने अगोदरच केले आहे.

तसेच, कोरोनाच्या त्रिसूत्रीचे कडक पालन करावे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाहक गर्दी करण्याचे टाळावे, अशा काही मार्गदर्शक सुचना पालिकेने गणेशमंडळांना केले आहे.

मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत परवानगीसाठी दाखल अर्जाची तपासणी पूर्ण होऊन योग्य त्या गणेशमंडळांना गणेशमंडपासाठी तात्काळ परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here