@maharashtracity

आरोग्य यंत्रणेकडून लसीकरणाबाबत वारंवार आवाहन

मुंबई: कोरोना संसर्गातून भयावह मृत्यू होण्याची शक्यता आहे. मात्र लसीकरण करुन घेतल्यास कोविड आजारातील प्रभाव कमी होतो असे वैद्यकीय तज्ज्ञ वारंवार सांगूनही अद्याप राज्यातील 21 जिल्हे लस टोचून घेण्यात मागे असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील लसीकरणाचा (vaccination) सरासरी वेग ४१ टक्केच असल्याचे समोर येत आहे. त्यात राज्यातील २१ जिल्हे सरासरी लसीकरणाच्या टक्क्याहून मागे असल्याने राज्यतील सार्वजनिक यंत्रणा लसीकरण पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे.

लसीकरणात मागे असलेल्या जिल्ह्यात प्रामुख्याने चंद्रपूर, पालघर, नाशिक, अहमदनगर, जालना, बुलढाणा, सोलापूर आदी जिल्ह्यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. यावर एका आरोग्य अधिकाऱ्याकडून नुकतेच येऊन गेलेल्या सण उत्सवांवर बोट ठेवत याच दरम्यान लाभार्थी लसीकरण केंद्रांवर कमी आले असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यातील लसीकरण मोहीम मंदावली आणि लसीकरणाची टक्केवारी कमी झाली आहे.

तर दुसरीकडे कोविड संसर्गाची भीती लोकांच्या मनातून कमी झाली असल्याने लसीकरण केंद्रांकडे लोक पाठ फिरवू लागले आहेत. पहिल्या डोस सोबत दुसऱ्या डोससाठी लोक केंद्रांवर येण्यास टाळाटाळ करत आहेत. यातून काही जिल्ह्यात दिवाळीपूर्वी दैनंदिन लसीकरण सरासरी २०,००० मात्रा एवढी होती. मात्र दिवाळी दरम्यान ते ५००० मात्र एवढ्यावर घसरली असल्याचे सांगण्यात आली.

Also Read: मुलांना शाळेत पाठवायचे की नाही ?

तेव्हापासून लसीकरणात सुधारणा होत नसल्याचे निरीक्षण ही यावेळी एका अधिकाऱ्याने मांडले. दरम्यान, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरण मोहिमेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींचे निराकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळेच राज्याच्या सरासरीपेक्षा कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांकडे लक्ष द्या, असा इशारा ही टोपे यांनी दिला आहे.

कोरोना स्थिती: राज्यात रविवारी ८३२ नवीन कोरोना रुग्ण आढळले तर मुंबईत २१० रुग्ण आढळले. रविवारी ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७ टक्के एवढा आहे. तसेच काल ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा असल्याचे सांगण्यता आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here