@maharashtracity

मुंबई: राज्यात बुधवारी २१३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,३९,३१९ झाली आहे. काल २२७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ७८,७७,२८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १३९४३ सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान राज्यात बुधवारी ८ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३०,१४,५३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,३९,३१९ (०९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत २८३ बाधित :
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २८३ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण ११२२७१२ रुग्ण आढळले. तसेच २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९६४६ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here