@maharashtracity

मुंबई: राज्यात शनिवारी २,४८६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,७५,५७८ झाली आहे. आज २,४४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,९९,४६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३३,००६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत

दरम्यान राज्यात शुक्रवारी ४४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,००,५७,३२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,७५,५७८ (१०.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २,४१,४९९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ५१०

मुंबईत दिवसभरात ५१० नव्या कोरोना रुग्णांची (corona patients in Mumbai) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४८१९५ एवढी झाली आहे. तर ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६१५२ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here