@maharashtracity

मुंबई: राज्यात शनिवारी २,६९६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,५६,६५७ झाली आहे. काल ३,०६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,७७,९५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३५,९५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात शनिवारी ४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आले. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९०,७४,६६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,५६,६५७ (११.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४७,००६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ४०८

मुंबईत दिवसभरात ४०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. (Corona patients in Mumbai) आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४३८१६ एवढी झाली आहे. तर ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६१२२ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here