@maharashtracity

मुंबई: मुंबईत झालेल्या 29 व्या अवयवदानात 71 वर्षीय पुरुषाचे अवयवदान झाले आहे. (Organ donation recorded in Mumbai). दिनांक 24 सप्टेंबररोजी या ज्येष्ठ व्यक्तीच्या अवयवदानातून तिघांना जीवदान मिळाले. त्यांना ब्रेनडेड घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या पुरूषाने यकृत आणि दोन्ही किडनी दान केल्या आहेत.

परळच्या ग्लोबल रुग्णालयात हे अवयव दान करण्यात झाले असून यकृत, दोन्ही किडनी दान करण्यात आले आहे. तर, वय जास्त असल्याने इतर अवयव दान करण्यात आले नसल्याचे झेडटीसीसीकडून सांगण्यात आले आहे.

सन 2020 या वर्षात एकूण 30 अवयवदानाची नोंद झाली. मात्र, गेल्या वर्षी कोरोनामुळे अवयवदान कमी नोंदवण्यात आली असल्याचे झेडटीसीसीकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here