@maharashtracity

मुंबई: कोरोना काळात मुंबईतील अवयवदान (organ donor movement) चळवळीला कोरोनाने घेरले होते. मात्र सध्या देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे अवयवदान मोहिमेला वेग आला असून गेल्या ११ महिन्यांत ३२ वे अवयवदान यशस्वी झाले असल्याचे विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समिती मुंबईकडून सांगण्यात आले.

दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ४६ वर्षीय पुरुष मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानाने तिघांना नवजीवन मिळाले. गेल्या वर्षी २०२० मध्ये, संपूर्ण वर्षभरात केवळ ३० अवयव दानाची नोंद झाली होती. यंदा मात्र त्यात भर पडत असल्याचे दिसून येत आहे.

झेडटीसीसी (ZTCC) समन्वयक संगीता देसाई यांनी सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital, Mulund) ४६ वर्षीय व्यक्तीला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. ब्रेन डेड (brain-dead) झाल्यानंतर नातेवाईकांनी त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या मृत व्यक्तीच्या दोन्ही मूत्रपिंडांसह यकृत दान करण्यात आले. या अवयवदानाचा तीन रुग्णांना लाभ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here