@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी ३,३२० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,३४,५५७ झाली आहे. काल ४,०५० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,५३,०७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३९,१९१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात गुरुवारी ६१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७६,४६,५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,३४,५५७ (११.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २,६१,८४२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,४६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ४९८

मुंबईत दिवसभरात ४९८ नव्या कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३९८५९ एवढी झाली आहे. तर ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६०६८ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here