राज्यात ४०७ नवीन रुग्ण तर मुंबईत शून्य मृत्यूची नववी वेळ

मुंबई: अगदीच घटणाऱ्या कोरोना रूग्ण संख्येत सोमवारी पुन्हा भर पडली. राज्यात सोमवारी ४०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. ही चारशेच्या घरातील नोंद कोविडला शेवटची घरघर लागल्याचे स्पष्ट करत आहे. त्याचवेळी मुंबईत कोरोना शून्य मृत्यू नोंद फेब्रुवारीत नवव्यांदा नोंदविण्यात आली.

दरम्यान, आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६५,७०५ झाली आहे. तर काल ९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,११,३४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,६६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात सोमवारी ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७८,७५,१०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६५,७०५ (१०.१०टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,३२,८८६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ७३ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ७३ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५५५५४ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६९१ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here