@maharashtracity

मुंबई: राज्यात शनिवारी ४,१३० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८२,११७ झाली आहे. काल २,५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५२,०२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात काल दिवसभरात ६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या (corona patient) मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४६,६०,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८२,११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ३,०२,१९६ व्यक्ती गृह विलागीकरणात (Home Quarantine) आहेत तर २,०१३ व्यक्ती संस्थात्मक विलागीकरणात (Institutional Quarantine) आहेत.

मुंबईत दिवसभरात ४१३:

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ४१३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४५८४६ एवढी झाली आहे. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९९१ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here