@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ४,१४५ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,९६,८०५ झाली आहे. काल ५,८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ६२,४५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात काल १०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात १९५ रुग्ण

मुंबईत (Mumbai) दिवसभरात १९५ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३९५२६ एवढी झाली आहे. तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९८४ मृत्यूची नोंद करण्यात आली.

मॉलमध्ये प्रवेशासाठी १८ वर्षाखालील मुलाना ओळखपत्र आवश्यक

राज्यात १८ वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड (Aadhaar card), पॅनकार्ड (PAN card), शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे.

कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेन (Break the Chain) अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने सोमवारी सुधारणा केली. त्यानुसार त्यांना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे.

राज्यातील सर्व शॉपींग मॉल्स (Shopping malls) रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या (vaccination) दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत यापूर्वीच निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here