@maharashtracity
मुंबई: राज्यात शनिवारी ४,१९६ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,६४,८७६ झाली आहे. काल ४,६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
राज्यात आजपर्यंत एकूण ६२,७२,८०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ५१,२३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात काल १०४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३९,७६,८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६४,८७६ (११.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २,९१,७०१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २,१२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional quarantine) आहेत.
मुंबईत दिवसभरात ३२३
मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३२३ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४४१५५ एवढी झाली आहे. तर १ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९७७ मृत्यूची नोंद करण्यात आली.