दोन दिवसात ५४९ मुलांचे लसीकरण

पहिल्या दिवशी १२४ मुलांचे लसीकरण

@maharashtracity

मुंबई: मुंबईत १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १२ केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी फक्त १२४ मुलांचेच लसीकरण (vaccination) झाले. मात्र, आज दुसऱ्या दिवशी ४२५ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवसांत एकूण ५४९ मुलांचे लसीकरण झाले आहे.

मुंबईत (Mumbai) मार्च २०२० पासून कोविड संसर्गाला (covid pandemic) सुरुवात झाली. त्यावेळी कोविडवर जगात कुठेही औषध अथवा लसही उपलब्ध नसल्याने कोविड रुग्ण संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे कोविडची पहिली लाट आली. त्यानंतर कोविड रुग्ण संख्येवर नियंत्रण व त्याचा झपाट्याने होणारा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला. त्यामुळे काही कडक निर्बंध आले.

जगातील व भारतातील आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोविड रुग्ण संख्येवर काही कालावधीनंतर काहीसे नियंत्रण आले. त्यानंतर कोविड रुग्ण संख्येत घट झाली. पहिली लाट नियंत्रणात आली. मात्र, त्यानंतर काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कोविडचा संसर्ग वाढला व रुग्ण संख्याही वाढली. त्यामुळे कोविडची दुसरी लाट आली.

त्यानंतर पुन्हा एकदा अथक प्रयत्नांनी व विविध उपाययोजनांमुळे कोविडच्या दुसऱ्या लाटेवर पालिका आरोग्य यंत्रणेला नियंत्रण मिळविणे शक्य झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा कोविड नियमांचे पालन काटेकोरपणे न झाल्याने कोविड संसर्ग वाढला. रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आणि अखेर कोविडची तिसरी लाटही आली.

यावेळीही पालिकेला खूप कसरत, मेहनत केल्यावर तिसऱ्या लाटेवर आताशी कुठे तरी नियंत्रण मिळवता आले. आता कोविडची तिसरी लाट परतावून लावण्यात पालिकेला यश आले आहे. आता पुन्हा एकदा कोविडची चौथी लाट येऊ नये, यासाठी पालिका व शासकीय आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.

याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या आदेशाने तरुण, महिला, वरिष्ठ नागरिकांपासून (senior citizen) सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. आता १२ ते १४ वयोगटातील मुलांचेही लसीकरण १६ मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी फक्त १२४ मुलांचे लसीकरण झाले. अत्यंत अल्प प्रतिसाद लाभल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसे आश्चर्य वाटले. मात्र आज लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी मात्र ४२५ मुलांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत एकूण ५४९ मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सरकारच्या आदेशाने पालिकेला १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here