@maharashtracity

रुपये ४५ कोटिंचा खर्च
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पालिकेची तयारी
एचडीएफसीच्या भागीदार संस्थेतर्फे ५०% खर्चाला हातभार
२०५ आयसीयू बेड, २५० डीसीएचसी बेड8

मुंबई: मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पूर्वतयारीचा भाग म्हणून महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalaxmi Racecourse) येथील जागेत येत्या एका महिन्यात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी जंबो कोरोना सेंटर (Jumbo Covid Center) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका ४७ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. या खर्चापैकी २३ कोटी रुपयांचा निधी म्हणजे ५०% खर्च रक्कम एचडीएफसीच्या (HDFC) भागीदार संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

या कोरोना सेंटरमध्ये २०५ आयसीयू बेड्स (ICU beds) आणि २५० डीसीएचसी बेड्स (DCHC beds) अशा ४५५ बेड्स उपलब्ध करण्यात येणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे या कामासाठी १३ लाख रुपये खर्चून एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) मार्च २०२० पासून मुंबईत सुरू झालेली कोरोनाची पहिली लाट योग्य उपाययोजना करून जानेवारी २०२१ मध्ये थोपवली. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पासून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाटही पालिकेने विविध उपाययोजना करून नियंत्रणात आणली आहे.

मात्र, आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (third wave of corona) चाहूल लागल्याने पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here