@maharashtracity

शहर भागात प्रभाग वाढ होणार नाही

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीत लोकसंख्येच्या आधारावर वार्ड व नगरसेवक संख्येत ९ ने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शहर भागात अत्यंत कमी तर पूर्व व पश्चिम उपनगरात लोकसंख्या वाढीचा आलेख खूपच वाढला आहे.

त्यामुळे ९ वार्ड व नगरसेवक यांची वाढ ही उपनगरातच होणार आहे. यामध्ये, पश्चिम उपनगरात ५ तर पूर्व उपनगरात ४ वार्ड व नगरसेवक संख्या वाढणार आहे. मात्र शहर भागात एकही वार्ड, नगरसेवक यांची वाढ होणार नाही, अशी माहिती पालिका सूत्रांकडून मिळाली आहे. (Increase in number of wards in suburban)

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC poll) फेब्रुवारीत २०२२ मध्ये होणे अपेक्षित असले तरी त्यात काही कारणास्तव बदल होऊन एक ते दीड महिना विलंब होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

Also Read: मुंबई महापालिकेत पाचव्यांदा नगरसेवक संख्येत वाढ होणार!

मात्र मुंबई महापालिकेने निवडणुकीची तयारी करताना २७ प्रभागांच्या सुधारित सीमांकनाचा मसुदा राज्याच्या निवडणूक आयोगाला ऑक्टोबर अखेरीस सादर केला.

त्यानुसार उपनगरातच सर्वाधिक लोकसंख्या वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढलेल्या भागात वार्ड व नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

सध्या, मुंबई शहर विभागात ५६, पूर्व उपनगरात ६९ तर पश्चिम उपनरात १०२ वार्ड, असे मिळून २२७ वार्ड व तेवढेच सर्वपक्षीय नगरसेवक आहेत. आता आगामी निवडणुकीसाठी त्यात आणखीन ९ वार्ड व नगरसेवक यांची वाढ होणार असून त्यामुळे एकूण वार्ड व नगरसेवक संख्या २३६ एवढी होणार आहे.

उपनगरातील खालील भागात वार्ड,नगरसेवक वाढणार

  • पवई, विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड
  • भांडूप-मुलुंड पश्चिम भाग
  • विक्रोळी-कांजूरमार्ग पूर्व
  • नाहूर, भांडूप पश्चिम
  • अंधेरी पश्चिम
  • गोरेगाव पश्चिम
  • मालाड पश्चिम
  • कांदिवली विभाग
  • बोरिवली-दहिसर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here