@maharashtracity
राज्यात तब्बल ११,८७७ नवीन कोरोना रुग्ण
मुंबई: राज्यात रविवारी ११,८७७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ६६,९९,८६८ झाली आहे. तर रविवारी २,०६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१२,६१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४२,०२४ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात रविवारी ९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९२,५९,६१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,९९,८६८ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४३,२५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर १०९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात ५० ओमिक्रोन रूग्ण :
राज्यात रविवारी 50 ओमिक्रोन (Omicron patients) संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (Indian Institute of Science Education and Research, Pune) (IISER) तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (NCCS) यांनी रिपोर्ट केले आहेत. या ५० रुग्णांपैकी पुणे मनपा -३६, पिपरी चिंचवड मनपा – ८, पुणे ग्रामीण २, सांगली- २, ठाणे -१ तर मुंबई -१ असे आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ५१० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.