@maharashtracity 


मुंबई
: राज्यात गोवरच्या ५०३ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी राज्यात गोवरचे २६ रुग्ण आढळले असून यात मुंबईत १४, भिवंडी येथे ७ तर मालेगाव मनपा येथे ५ असे झाले आहेत. मुंबईमधील ८ वॉर्डस हे सर्वाधिक गोवर प्रभावित असून एम इस्ट वॉर्ड मध्ये सर्वाधिक म्हणजे ५ रुग्ण आढळले आहेत. तर ३ रुग्ण एल वॉर्डमध्ये आढळले आहेत.

मुंबईत ८ संशयित गोवर रुग्णांचा (measles patients) मृत्यू झाला आहे. यातील ७ रुग्ण एम इस्ट वॉर्ड मधील तर १ रुग्ण एल वॉर्ड मधील आहे. यातील फक्त एका बालकाने गोवरचा एक डोस घेतला आहे. उर्वरित बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलेली नाही. मुंबई मधील गोवर परिस्थितीनुसार एकूण उद्रेक १४ असून एकूण संशयित गोवर रुग्ण १२५९ एवढी आहे. तर निश्चित निदान झालेले रुग्ण १६४ असून संशयित गोवर मृत्यू ८ इतके आहेत.

गोवर आजर म्हणजे 

गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य असा आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया (Pneumonia), क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या गोवर, रुबेलासारख्या सर्व आजारांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here