@maharashtracity

धुळे: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी धुळे शहरात शहीद स्मारक उभारण्यासाठी 6 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच शहरातील पोलीस वसाहतीच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन वळसे पाटील यांनी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांना दिले. (HM Dilip Walse Patil assures to give fund for Shahid memorial)

आमदार शाह (MLA Faruk Shah) यांनी शहराच्या मध्यभागी असणाऱ्या पोलीस वसाहतीच्या समस्यांचा पाढा गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर वाचला.

संपूर्ण वसाहतीच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी अस्तित्वात नाहीत. परिणामी संपूर्ण पाणी हे लगतच्या मैदानात साचते. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. सातत्याने पोलीस व पोलीस परिवारातील सदस्य यामुळे साथीच्या आजाराचे बळी ठरत आहेत.

संपूर्ण वसाहतीमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली असून त्या दृष्टीने नवीन गटारी व रस्ते करणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस मैदानातील शहिद स्मारकाची अवस्था बिकट झालेली आहे. त्यासाठी शहीद स्मारके बांधण्यासाठी व इतर सर्व समस्या दूर करण्यसाठी गृहमंत्री वळसे पाटील यांनी समस्या जाणून घेत ६ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले आणि संबधितांना प्रस्ताव सादर करण्यास आदेशित केले. अशी माहिती आमदार शाह यांच्या वतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here