@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी ६,४७९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१०,१९४ झाली आहे. काल ४,११० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,९४,८९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ७८,९६२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात रविवारी १५७ कोरोनाबाधित रुग्णांच्या (corona patient) मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८१,८५,३५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,१०,१९४ (१३.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ४,६७,९८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,११७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३२८

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३५१०७ एवढी झाली आहे. तर १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५८९९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here