@maharashtracity
मुंबई: कोविड (covid) संसर्गाला 21 महिने पूर्ण झाले असून या कालावधीत राज्यात 66 लाख नागरिकांना कोरोनाबाधा झाली असल्याचे आकडेवारी सांगते. या आजारात 21 ते 50 वयोगटातील 58 नागरिक बाधित झाले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर तरुण आणि प्रौढ चरितार्थ चालविण्यास घरा बाहेर पडले. मात्र या संघर्षात लोकांना कोरोनाबाधा झाली.
आरोग्य विभागाकडून (health department) मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 66 लाख 70 हजार 441 नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 21 ते 30 वयोगटातील 11 लाख 93 हजार 466 जणांना विषाणूची लागण झाली आहे, तर 31 ते 40 वयोगटातील 14 लाख 81 हजार 374 आणि 41 ते 50 वयोगटातील 11 लाख 90 हजार 10 प्रौढांना या विषाणूची लागण झाली आहे.
21 ते 50 वयोगटातील लोकांना काम, अभ्यास आदींसाठी घराबाहेर पडावे लागत असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Dr Pradeep Awate) यांनी सांगितले. तसेच तरुण आणि वृद्धांच्या तुलनेत कोरोनाचा मुलांवर थोड्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तरीही एकूण बाधित रुग्णांपैकी 11 टक्के रुग्ण हे 0 ते 20 वयोगटातील आहेत.
Also Read: मच्छीमारांना भरपाई देण्याबाबत शिवसेना – भाजपचे एकमत
मुंबईत (Mumbai) 7 लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 20 ते 39 वयोगटातील 4 लाख 2 हजार 23 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. तर, 0 ते 19 वयोगटातील 51,663 लहान आणि किशोरवयीन मुले या विषाणूच्या विळख्यात सापडली आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 0 ते 10 वयोगटातील 2 लाख 12 हजार 617 किशोरवयीन आणि 11 ते 20 वर्षे वयोगटातील 4 लाख 97 हजार 486 मुलांना या आजाराची लागण झाली आहे.