@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी ६,६९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,३६,२२० झाली आहे. काल ७,१२० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,२४,२७८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ७४,९९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच गुरुवारी राज्यातील कोविड बाधित रुग्णांची दिनांक २६ जुलैपर्यंतची तर अमरावती जिल्ह्याची ही प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत रिकॉनसिलिएशन करण्यात आले. यात प्रयोगशाळांनी दिलेल्या बाधित रुग्ण माहितीचा समावेश गुरुवारी झाल्याने राज्यातील एकूण रुग्ण संख्येत २२३१ ने वाढ झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, राज्यात गुरुवारी १२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८९,६२,१०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,३६,२२० (१२.९४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ४,४६,५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत दिवसभरात ३२७

मुंबईत दिवसभरात ३२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३६५५३ एवढी झाली आहे. तर ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९२९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here