मुंबईत दिवसभरात ३७३ रुग्ण

@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ६,७५३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,५१,८१०  झाली आहे. काल ५,९७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२२,४८५  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९६.३३ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ९४,७६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात काल १६७  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ४,६४,४६,३६० प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६२,५१,८१० (१३.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५२,७०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत दिवसभरात ३७३

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३३३४४ एवढी झाली आहे. तर ८ कोरोनाबाधित (corona patient) रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५८१८ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here