राज्यात २०७ नवीन कोरोना रुग्ण

@maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी २०७ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७१,५६६ झाली आहे. आज २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२१,५१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate of corona patients) ९८.०९% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,२९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच राज्यात मंगळवारी ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८७,३७,६०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७१,५६६ (१०.०० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ५० बाधित

मुंबई (Mumbai) महानगरपालिका क्षेत्रात ५० एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५६,४१९ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६९२ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here