@maharashtracity

मुंबई: राज्यात २० शुक्रवारी ओमिक्रोन व्हेरिअंटचे रूग्ण आढळून आले. यातील एकट्या मुंबईत ११ रूग्ण आढळले. ओमिक्रोनची वाढती रुग्ण पाहता मुंबई पालिकेने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे.

यात दुबईहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य नाही. मात्र दुबईहून मुंबईत आल्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणे बंधनकारक असल्याचे लागू करण्यात आले आहे.

वाढत्या ओमिक्रोनच्या रुग्णसंख्येमुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या विषाणुला रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

पालिकेच्या परिपत्रकानुसार दुबईहून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर, प्रवाशाचे घर मुंबईबाहेर असल्यास, त्या व्यक्तीला मुंबईबाहेरील त्याच्या/तिच्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा प्रवाशाला मुंबईबाहेरील खासगी वाहनाने त्याच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे.

तसेच एखाद्या प्रवाशाने दुबई ते मुंबई आणि त्यानंतर मुंबई ते राज्याच्या अन्य जिल्ह्यात किंवा अन्य राज्यात जोडणाऱ्या विमान असल्यास तो प्रवासी दुबईहून आला, हे पुढील विमानतळावर कळवण्याची जबाबदारी मुंबई विमानतळ प्राधिकरणाची राहणार आहे.

तसेच दुबईहून मुंबईला येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पहिले ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. त्यादरम्यान ते प्रवासी त्याच्या पालिका वॉर्ड वॉर रूमच्या संपर्कात राहतील. सातव्या दिवशी, त्याची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असेल.

सातव्या दिवशी कोविडचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर, त्या प्रवाशाला 7 दिवस स्वत:चे आरोग्य निरीक्षण करावे लागेल. या देखरेखीच्या 7 दिवसांनंतर, जर कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर त्या व्यक्तीला कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाणार असल्याचे पालिका सूचनेत स्पष्ट म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here