मुंबईत दिवसभरात ५२८ बाधित

@maharashtracity

मुंबई: गुरुवारी राज्यात ८,०१० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,८९,२५७ झाली आहे. काल ७,३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,५२,१९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,०७,२०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आज १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४८,२४,२११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,८९,२५७ (१३.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५,८१,२६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ५२८:
मुंबईत दिवसभरात ५२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२९७९१ एवढी झाली आहे. तर १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५६६७ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here