@maharashtracity

कोरोनाचे ३,८९८ नवीन रुग्ण आढळले

मुंबई: राज्यात मंगळवारी ३,८९८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९३,६९८ झाली आहे. काल ३,५८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०४,३३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४७,९२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात मंगळवारी ८६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५१,५९,३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९३,६९८ (११.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ३,०६,५२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३४९:

मुंबईत दिवसभरात ३४९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४७०७३ एवढी झाली आहे. तर २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६००० मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here