राज्यात ३१४२ नवीन रुग्ण

@maharashtracity

मुंबई: पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या (BJ medical College, Pune) ताज्या अहवालानुसार कोरोनाच्या बीए-५ व्हेरीयंटचे सहा तसेच बीए-४ व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुण्यातील आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए-४ आणि बीए-५ रुग्णांची संख्या ७३ झाली आहे.

या पैकी पुण्यात २४, मुंबईत ३४, नागपूर, ठाणे आणि पालघर येथे प्रत्येकी ४ तर रायगडमध्ये ३ रुग्ण आढळले असल्याचे सांगण्यात आले. या शिवाय बीए-२.७५ या व्हेरीयंटचे राज्यात एकूण १० रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. हे सर्व नमुने २१ जून ते २९ जून २०२२ या कालावधीतील आहेत. हे सर्व रुग्ण लक्षणविरहित असून ते घरगुती विलगीकरणात (home quarantine) बरे झाले आहेत.

राज्यात ३१४२ नवीन रुग्ण

राज्यात बुधवारी ३१४२ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,९३,०५१ झाली आहे. काल ३९७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,२५,११४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९० टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण १९,९८१ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी राज्यात ७ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२२,२०,५१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,९३,०५१ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ६९५ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ६९५ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,१५,९०५ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,६२० एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here