राज्यात ९७ नवीन रुग्ण

@maharashtracity

मुंबई: राज्यात शनिवारी ९७ नवीन कोरोना रुग्णांची दैनंदिन नोंद झाली. २०२० वर्षाच्या ३ एप्रिल रोजी ६७ एवढी रूग्ण नोंद करण्यात आली होती. त्यानंतर प्रथमच काल ९७ एवढी दोन अंकी नोंद झाली. या नोंदीसाठी दोन वर्षाचा कालावधी लागल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,७२,३०० झाली आहे. आज २५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२३,००५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१०% एवढे झाले आहे.

राज्यात शनिवारी १ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८९,०९,११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७२,३०० (०९.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,५२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत २९ बाधित

मुंबई (Mumbai) महानगरपालिका क्षेत्रात २९ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५६,६१३ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६९३ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here