राज्यात ९७३ नवीन रुग्ण
@maharashtracity
मुंबई
राज्यात शुक्रवारी एकूण ८,६८८ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. गेले कित्येक दिवस राज्यातील सक्रिय रुग्णांची नोंद दहा हजाराहून अधिक होत होती. तसेच राज्यात ९७३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६३,६२३ झाली आहे.
आज २,५२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,०७,२५४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०१ % एवढे झाले आहे.
तसेच राज्यात आज १२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७६,५८,९७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६३,६२३ (१०.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,४७,८०० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ७४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत पुन्हा शून्य मृत्यू नोंद
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १२८ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५५२८९ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने शून्य मृत्यू नोंद सहाव्यांदा झाली असल्याचे सांगण्यात आले. आता मृत्यूची संख्या १६६९१ एवढी झाली आहे.
फक्त पुण्यातून ६२ ओमीक्रॉन रूग्ण
आज राज्यात ६२ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. यात पुणे- ६० तर पुणे ग्रामीण-२ असे सांगण्यात आले. आजपर्यंत राज्यात एकूण ४६२९ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ४४५६ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८३३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १०४९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.