@maharashtracity

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

मुंबई: प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने भेसळयुक्त दूध (adulteration in milk) विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अंधेरीमध्ये छापा मारून ही कारवाई केली. कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयास प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी गौरी जोशी व गुन्हे शाखा युनिट 10 यांच्या संयुक्त पथकाने सहायक आयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी खोली नं. २६, तेलगु चाळ, शांती नगर,सहार गांव, अंधेरी (पू) येथे धाड टाकली असता या ठिकाणी अमुल ताजा (Amul Taaza), गोकुळ (Gokul), अमुल या ब्रॅण्डच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये टॅम्परिंग होत असल्याचे आढळले.

या नामांकित कंपन्यांच्या पॅक पिशव्यांमधील चांगले दुध काढून त्यामध्ये पाण्याची भेसळ होत असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून पाश्चराईज होमोजीनाईज्ड टोंड मिल्कचे अमुल ताजा, पाश्चराईजचे गोकुळ, पाश्चराईज फुल क्रीम मिल्कचे गोकुळ व पाश्चराईज बफेलो मिल्कचे अमुल या ब्रॅण्डच्या टॅम्पर केलेल्या दुधाचे ४ नमुने विश्लेषनासाठी ताब्यात घेऊन अन्न चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

उर्वरित ३२५ लिटर, १७,५९३ किंमतीचा दूधाचा साठा टेम्पर्ड केलेला असल्यामुळे व त्यामध्ये पाण्याची भेसळ केलेली असल्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या हितार्थ जागेवरच नष्ट करण्यात आला. अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदेकायदा 2006 नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल.

या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दुधाचा दर्जा आबाधीत राहून नागरिकांना सुरक्षित व आरोग्यदायी दर्जाचे दूध उपलब्ध होण्यासाठी प्रशासन दक्षतेने कामकाज करीत आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारे अन्न पदार्थाच्या पदार्थाच्या दर्जा बाबत शंका असल्यास प्रशासनाचे टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३७५ वर तक्रार करु शकता, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here