@maharashtracity

सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मुंबईत हवेचा निर्देशांक वाईट

मुंबई: दक्षिण मुंबईतील वायू प्रदुषणाचा निर्देशांक सोमवारी ३४५, तर मंगळवारी कुलाबा परिसरातील निर्देशांक ३५३ नोंदवला गेला. बुधवारी यात किंचित घट होऊन मुंबई शहराचा निर्देशांक २०४ एवढा नोंदविण्यात आला. असे सलग तीन दिवस मुंबई आणि परिसरातील हवा खराब होण्याचे निर्देशांक (air pollution index) नोदविण्यात येत आहेत. यातून दिल्लीकरांच्या पाठोपाठ मुंबईकरांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे.

दरम्यान, बुधवारी यात थोडी घट होऊन ३२८ एवढा निर्देशांक झाला. असे असले तरीही हा निर्देशांक हवामान पोषक असल्याचे द्योतक नाही असे हवामान तज्ज्ञ सांगतात.

समुद्रावरुन वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग, लॉकडाऊन उठल्यावर वाहनांमुळे वाढलेले प्रदुषण आणि वाढलेली आर्द्रता या सर्वाचा परिणाम मुंबईतील हवेवर झाला आहे.

त्यामुळे, मुंबईकरांनी (Colaba Mumbai) काळजी घेण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. सफरने बुधवारी दिल्लीचा (Delhi) हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३६२ एवढा नोंदवला आहे.

तर, त्यापाठोपाठ मुंबईतील कुलाबा परिसरात ३२८ हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदला गेला असून इथे अतिशय वाईट दर्जाच्या हवेची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारी कुलाबा परिसरातील हवेचा दर्जा अतिशय वाईट या श्रेणीत नोंदला गेला आहे.

हवा तक्ता :
शहर दर्जा निर्देशांक
दिल्ली अतिशय वाईट ३६२ एक्यूआय
मुंबई वाईट २०४ एक्यूआय
कुलाबा अतिशय वाईट ३२८ एक्यूआय
माझगाव अतिशय वाईट ३१९ एक्यूआय
मालाड वाईट २९३ एक्यूआय
बीकेसी वाईट २३२ एक्यूआय
भांडूप मध्यम १०५ एक्यूआय
वरळी मध्यम १०० एक्यूआय
बोरिवली मध्यम १३७ एक्यूआय
चेंबूर मध्यम १८० एक्यूआय
अंधेरी मध्यम १४६ एक्यूआय
नवी मुंबई मध्यम ११४ एक्यूआय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here