Twitter: @maharashtracity

महाड: महाड तालुक्यातील महाड – भोर – पंढरपूर रस्त्यावरील ईशाने कांबळे गावाजवळ पहाटेच्या सुमारास चालू प्रवाहातील ट्रान्सफॉर्मरमधील कॉइल चोरीच्या प्रयत्नात अज्ञात चोरट्याचा शॉक लागून संपूर्ण शरीराचा कोळसा होऊन मृत्यू पावल्याची घटना आज सकाळी घडली. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे या घटनेचा सखोल तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलादपूर तालुक्यात अनेक गावात ट्रान्सफॉर्मरमधील कॉईल चोरी करणारी टोळी सक्रिय असून त्याचा तपास आजपर्यंत लागलेला नाही. त्यातच त्याची पुनरावृत्ती महाड तालुक्यात होण्यास सुरुवात होण्याअगोदरच अज्ञात टोळीमधील एकाचा मृत्यू होण्याची घटना घडली आहे.

महाड – पंढरपूर रस्त्यावरील ईशाने कांबळे गावाजवळ रस्त्यावर असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉइल चोरी करून पहाटेच्या सुमारास पसार होण्याच्या तयारीत असणाऱ्या अज्ञात टोळीमधील एकाचा शॉक लागून संपूर्ण शरीर काळे ठिक्कर होऊन मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. याबाबत महाड एमआयडीसी पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व पोलादपूर तालुक्याचे विद्युत अभियंता यांच्या सहकार्याने पोलीस तपास सुरू आहे. अज्ञात मृत व्यक्तीचे नाव समजलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here