@maharashtracity

आवाज फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आणि मुंबई पालिका आयुक्तांना पत्र

मुंबई: मुंबईतील हवेच्या प्रदुषणाची पातळी (level of air pollution) सतत वाढत आहे. यातून मुंबईकरांच्या (Mumbaikar) आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो. हवेचा दर्जा वाईट, अतिवाईट किंवा अपायकारक पातळीपर्यंत पोहोचतो, अशावेळी सार्वजनिक आरोग्याबाबतचा इशारा देण्यात यावा, असे आवाज फाऊंडेशनकडून सुचविण्यात आले आहे.

तसे निवेदन मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री आणि मुंबई पालिका आयुक्तांना फाऊंडेशनकडून देण्यात आले असल्याचे आवाज फाऊंडेशनच्या (Awaaz Foundation) सुमैरा अब्दुलअली (Sumaira Abdulali) यांनी सांगितले.

दरम्यान, मागच्या महिन्यात २२ ते २३ जानेवारी कालावधीत मुंबईत धुळीचे वारे (dust storm) घोंगावले होते. मात्र ही धुळ मुंबईच्या भौगोलिक स्थानामुळे काही दिवसातच ओसरली. तरीही तीन दिवस मुंबईकरांना प्रंचड प्रदुषणाचा सामना करावा लागला.

यादरम्यान मुंबईतील हवेचा दर्जा सरासरी निर्देशांक ५०० हूनही अधिक गेला असल्याची नोंद आहे. तर इतर ठिकाणांवरील निर्देशांक ३५० ते ४०० च्या घरात होता. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, वर्षभर मुंबईतील हवा या ना त्या कारणांमुळे प्रदुषित राहत असते. अशा वेळी हवेच्या प्रदूषणाची पातळी वाढल्याने आरोग्याबाबत इशारा देण्यात यावा असे फाऊंडेशनकडून सुचित करण्यात आले आहे.

मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुरक्षित आरोग्य मर्यादेच्या वर जाऊन तो वाईट, अतिवाईट किंवा अपायकारक पातळीपर्यंत पोहोचतो तेव्हा सार्वजनिक आरोग्य इशारा देण्यात यावा, अशी सुचना सुमैरा अब्दुलली यांच्याकडून करण्यात आली आहे. अशा प्रकारचा इशारा दिला गेल्यास आरोग्यविषयक पूर्व सल्ला तज्ज्ञांकडून घेण्यात येऊ शकतो.

लोकांमध्ये जागरुकता वाढल्यास आरोग्य विषयक काळजी घेतली जाऊ शकते. प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यास ज्येष्ठ नागरिक, मुले, गरोदर महिला यासारखा कमी रोग प्रतिकारशक्ती असलेला गट स्वतःचे संरक्षण करू शकतील, असे ही सुमैरा म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here