कोविड वर्तणुक नियम पाळण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

@maharashtracity

मुंबई: राज्यातील रुग्णवाढीची बाब ध्यानात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी तातडीची बैठक घेतली. यावेळी १५ दिवसांचा अवधी दिला असला तरी देखील बीए४ तसेच बी५ हे दोन व्हेरिंयंट संसर्ग वाढीच्या संशयाच्या भोवÚयात असल्याचे मत तज्ज्ञ मांडत आहेत. त्यामुळेच कोविड वर्तणुकीतील मास्क (Mask) आणि लसीकरणावर (vaccination) भर देण्याची सुचना कोरोना टास्क फोर्समधील (covid task force) तज्ज्ञ करत आहेत.

दरम्यान, २८ मे रोजी पुण्यात बीए४ (BA-4 variant) आणि बीए५ (BA-5 variant) या दोन व्हेरियंटचे सात रुग्ण आढळले. हे सर्व सौम्य लक्षणांचे होते. तसेच ते बरेही झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हा संसर्ग जलद गतीने जगात वाढत असल्याचा अनुभव तज्ज्ञ सांगत आहेत. तसेच मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून २४ तासांत सक्रिय रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी यावर बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबई आणि पुण्यात असल्याचे स्पष्ट केले होते. राज्यात सक्रिय रुग्ण ४ हजारांपार असून यातील ३ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईतील असल्याचे आकडेवारी सांगते. दरम्यान, कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सध्याची रुग्णवाढ ही सायलेंट लाट दाखवत असल्याचे मत मांडले. मात्र ही चौथी लाट (fourth wave of corona) नक्की नाही. यात ओमिक्रॉनचा (omicron) सौम्य प्रभाव देखील दिसून येत आहे. मात्र, कोविड रुग्णांमधील वाढ चिंतनीय असून प्रत्येकाने कोविड वर्तणूक पाळणे आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. यात मास्क आणि लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here