@maharashtracity

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई: मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक तोंडावर आलेली असताना मुंबईतील वडाळा (Wadala) व चेंबूर (Chembur) या ठिकाणी असलेल्या पदपथांची (footpath) सुधारणा आणि सौंदर्यीकरण (beautification) करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वडाळा आणि चेंबूर या दोन ठिकाणच्या प्रकल्पांचे भूमिपूजन राज्याचे पर्यटन, पर्यावरण व मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

याप्रसंगी, शिवसेना खा. राहुल शेवाळे, आ. प्रकाश फातर्पेकर, माजी आमदार तुकाराम काते, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, नगरसेवक अमेय घोले, उप आयुक्त हर्षद काळे, विश्वास शंकरवार, राजन तळकर, एम/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे, एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, रस्ते विभागाचे इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रामध्ये शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही विभागांमधील पदपथांची नावीन्यपूर्ण पद्धतीने, नागरी विकासाच्या आधुनिक मापदंडाना अनुसरून आणि महानगराच्या सौंदर्यात भर होईल, अशा रीतीने बांधणी, सुधारणा व सुशोभीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

पादचाऱ्यांना (pedestrian) चालण्यासाठी सुलभतेला आणि त्यांच्या सुरक्षिततेला लक्षात ठेवून नवीन पदपथ संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. प्रारंभी चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हे काम केले जाणार आहे.

यामध्ये एफ/उत्तर विभागात लेडी जहांगीर रस्त्यावरील पदपथ (रुईया महाविद्यालय ते वडाळा रेल्वे स्थानक), एम/पश्चिम विभागातील चेंबूरमध्ये दयानंद सरस्वती मार्ग ते डायमंड गार्डन पर्यंत, एच/ पूर्व विभागातील वांद्रे (पूर्व) मध्ये अली यावर जंग मार्ग आणि एस. डी. मंदिर मार्ग, पी/दक्षिण विभागातील गोरेगाव मध्ये एम. जी. मार्ग या ठिकाणी नावीन्यपूर्ण पदपथ बांधले जाणार आहेत.

Also Read: अबब! जनावरांच्या कोंडवाड्यासाठी १० कोटींचा खर्च?

यापैकी चेंबूर आणि वडाळा येथील पदपथ सुशोभीकरणाचे भूमिपूजन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

या नवीन पदपथांची संकल्पना ही पादचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून पदपथांवर चालण्याची क्षमता वाढीस लागणार असल्याने नागरिकांना सुखकर अनुभव येईल, असा दावा पालिकेने केला आहे.

तसेच, पदपथांची भौतिक स्थिती सुधारून, पदपथांसह रस्त्यांचे सौंदर्य देखील यात वाढेल. पदपथ आणि नागरी विकासाच्या आधुनिक संकल्पना व मार्गदर्शक तत्त्वांचा यामध्ये समावेश करून अंमलबजावणी केली जाणार आहे. सुमारे ४० ते ५० वर्ष टिकतील आणि कमीत कमी खर्चामध्ये परिरक्षण करावे लागेल, अशा पद्धतीचे हे पदपथ राहणार आहेत.

पदपथांचा पृष्ठभाग समतल राखणे, रस्ता ओलांडणे सुलभ होणे, प्रमाणबद्ध आणि सर्वसमावेशक असे सूचना फलक लावून पादचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, विद्यमान पथदिव्यांमध्ये आधुनिकता आणून पदपथांचे सौंदर्य वाढवणे, आधुनिक पद्धतीने बनवलेले बाक, कचरापेटी, फुलझाडे इत्यादी लावणे, पदपथावरील वृक्षांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या सभोवताली वृक्ष संरक्षण उपाययोजना करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व सुशोभीकरणाला अनुरूप असे प्रभावी आणि आधुनिक बस थांबे उभारणे या सर्व बाबींचा या कामांमध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here