@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका पर्यावरण, पर्यटन व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेतून आगामी काळात बेस्टच्या प्रवाशांसाठी (BEST commuters) उपनगरात ८ कोटी ७६ लाख रुपये खर्चून १०५ पारदर्शक बस थांबे (Bus stop) उभारणार आहे. त्यामुळे बस प्रवाशांचे ऊन, पाऊस, थंडीत संरक्षण होणार आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) अशा प्रकारचे पारदर्शक बस थांबे हे फोर्ट (Fort) परिसरात उभारले आहेत. त्याचा चांगला वापर होत असल्याने आता उपनगरातही तसे बस १०५ थांबे नव्याने उभारण्याचा निर्णय बेस्ट व पालिका प्रशासन यांनी घेतला आहे.

या कामासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. योग्य व पात्र कंत्राटदारामार्फत येत्या ६ महिन्यात पालिका हे काम मार्गी लावणार आहे.

मुंबईत बेस्टचे ६ हजार बसथांबे आहेत. बेस्टने अनेक ठिकाणी यापूर्वी लोखंडी बस थांबे उभारली होती. त्यानंतर त्याचे रुपडे पालटले व त्याजागी स्टीलचे बस थांबे आले. मात्र त्यामध्ये प्रवाशांना बसण्याची व्यवस्था अडचणीची होती.

तसेच, ऊन, हिवाळा पावसाळ्यात या बस थांब्यामुळे प्रवाशांना संरक्षण मिळणे कठीण व अडचणीचे ठरत होते. त्यामुळे आता या बस थांब्याचे रुपडे पालटून पारदर्शक स्वरूपाचे व ऊन, पाऊस, हिवाळ्यात प्रवाशांचे संरक्षण होईल, पारदर्शक बस थांबे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

नवीन स्वरूपाचे बस थांबे उभारताना, पहिल्या टप्प्यात ओशिवरा येथे १५, गोवंडी येथे १३, देवनार येथे ११, गोरेगाव येथे १० थांबे बदलण्यात येतील. या चार ठिकाणांसह पुर्व आणि पश्‍चिम उपनगरातील १६ ठिकाणे थांबे बदलण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here