@maharashtracity

भाजपचा आक्षेप व पालिका आयुक्तांना अहवाल

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC polls) पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने राजकीय दबावाखाली प्रभाग पुनर्रचना केली असल्याचा आरोप पालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) यांनी केला आहे.

प्रभाकर शिंदे यांनी यासंदर्भातील एक अहवाल तयार करून पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांना सादर केला आहे. शिंदे म्हणाले, पालिकेच्या २२७ पैकी १४८ (६५.२ टक्के) प्रभागांच्या सीमारेषा (ward boundaries) बदलल्या आहेत. तसेच, तब्बल १६९ प्रभागांमधील काही भाग हे शेजारच्या प्रभागांत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

हा सर्व प्रकार नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे याचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे, असा आक्षेप प्रभाकर शिंदे यांनी घेतला आहे.

मुंबई महापालिकेने निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना करताना बहुतेक प्रभागात काही फेरबदल केले आहेत. हे फेरबदल कमी – अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे भाजप नगरसेवकांच्या अडचणी जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपने त्यावर आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे या प्रभाग पुनर्रचनेचे प्रकरण सध्या न्यायालयात गेले आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय देणार हे बघावे लागणार आहे.

मुंबईतील २२७ प्रभागांची पुनर्रचना करताना त्यातील झालेल्या बदलांबाबत राजकीय पक्ष, सामान्य नागरिक यांच्याकडून तब्बल ८१२ हरकती व सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मात्र, कलम ४.५.१ नुसार प्रभाग रचना उत्तर दिशेपासून सुरू झाली पाहिजे होती. उत्तरेकडून ईशान्यकडे, पूर्वकडून पश्चिमेकडे आणि शेवटी दक्षिण दिशेकडे असायला हवी होती. मात्र पालिकेने या प्रभाग पुनर्रचनेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

ही प्रभाग पुनर्रचना करताना इमारत, झोपडी किंवा घर यांचे दोन प्रभागांत विभाजन करण्यात आले आहे. या पुनर्रचनेमुळे लोकप्रतिनिधी व सामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सुद्धा कमी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here