@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या (BMC polls) तोंडावर महाविकास आघाडी सरकारने (MVA) मुंबईतील २२७ प्रभाग संख्येत आणखीन ९ जादा प्रभाग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अध्यादेशही जारी झाला आहे. मात्र भाजपने (BJP) या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत थेट न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले आहे.

राज्य सरकारने, प्रभाग संख्या वाढीबाबत घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी भाजपतर्फे न्यायालयात दाखल याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर (Rajeshree Shirwadkar) व नगरसेवक अभिजीत सामंत (Abhijeet Samant) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली असून गुरुवार ९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

राज्यातील सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या महाविकास आघाडी सरकारने २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या (Census) आधारे मुंबईतील प्रभागांची संख्या ९ ने वाढवण्याबाबतचा निर्णय काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता.

त्यावेळी भाजपने त्यास विरोध दर्शवला होता. मात्र आता त्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश (ordinance) जारी केला आहे. भाजपने या निर्णयाला विरोध करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत न्यायालय काय निर्णय देणार त्यावर पुढील कार्यवाही अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here