@maharashtracity
सीबीआय चौकशी करा!
भाजपची पोलीस प्रशासनाकडे मागणी
धुळे: धुळे जिल्ह्यातील साक्री येथील नगरपंचायत (Sakri Nagar Panchayat) निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांवर वचपा काढण्यासाठी महिलेच्या खूनाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, जिल्हा संघटन सरचिटणीस डी.एस.गिरासे, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, किशोर संघवी, शंकरराव खलाणे, रितेश परदेशी, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, चंद्रजित पाटील, प्रा. विजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, मोहन सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की साक्रीतील नगरपंचायतीत पहिल्यांदाच भाजप सत्तेत आल्याने राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shiv Sena) पक्षातील कार्यकर्त्यांना त्याचा राग आला. यामुळे महिलेचा मृत्यूशी संबंध नसताना भाजपच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रकार राष्ट्रवादी, शिवसेनेतर्फे झाला आहे.
संबंधित महिलेचे इन कॅमेरा शवविच्छेदन (in camera post mortem) करावे, नमुने, मृताचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबकडे (Forensic Lab) तपासणीसाठी पाठवावा, घटनेची सीबीआयमार्फत चौकशी (CBI probe) करावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.