@maharashtracity

महिला व बालकल्याण समितीवर नगरसेविका बागुल, पवारांची निवड निश्‍चित

धुळे: धुळे महानगर पालिकेच्या (Dhule Municipal Corporation – DMC) स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपाचे (BJP) नगरसेवक शितल नवले यांनी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी नगरसेविका योगिता प्रशांत बागुल तर उपसभापती पदासाठी नगरसेविका आरती अरूण पवार यांनी शनिवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

उपसभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका आरती अरूण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत होती. या मुदतीत विरोधी पक्षातील कुणीही अर्ज दाखल केलेला नाही.

महाविकास आघाडीतील सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे कुणीही मैदानात उतरले नाहीत. त्याचबरोबर एमआयएम अथवा समाजवादी पक्षानेे देखील उमेदवारी दाखल करण्यासाठी उत्सुकता दाखविली नाही. यामुळे शितलकुमार नवले, योगिता बागुल आणि आरती पवार यांची बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे. या निवडीची औपचारीक घोषणा मंगळवार दि.15 रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here