@maharashtracity

पालिकेला मिळणार उत्पन्न

प्रकल्प व्यवस्थापनासाठी ३५ कोटींचा सल्लागार

मुंबई: मुंबई महापालिका मिठी नदीचा विकास (Development and rejuvenation of Mithi River) प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणार आहे.

मिठी नदी विकास कामासाठी ५ वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र २ वर्षांसाठी ३६ कोटींचा सल्लागार (consultant) नेमण्यात येणार आहे. या कामाच्या अंतर्गत नदी परिसरात कृत्रिम तलाव (artificial lake) बंधारे उभारणे, नदी परिसर सुशोभित करणे, कृत्रिम जंगल निर्माण करण्यात येणार आहे. तसेच, नदी परिसरात हॉटेल्स (Hotels) व्यवसाय सुरू करून आणि नदी पात्रात जलक्रीडा प्रकार (water sports), जल वाहतुक सुरू करून त्या द्वारे महसूल उत्पन्न मिळविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र, या प्रस्तावातील अपुरी माहिती आणि सल्लागारावरील ३६ कोटींचा खर्च पाहता पालिकेतील पहारेकरी भाजपच्या नगरसेवकांकडून (BJP corporators) या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय पर्यावरण (Environment department) खाते व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मुंबईतील प्रदूषित नद्यांवरून फटकारले व दंडात्मक कारवाई केल्याने खडबडून जागृत झालेल्या मुंबई महापालिकेने (BMC) मुंबईतील मिठी, पोयसर, दहिसर, वालभट या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी ३६ कोटी रुपये खर्चून मे. टिपीएफ इंजिनिअरिंग व मे. पॅसिफिक कन्सल्टंट या संयुक्त कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प कामातून नदीतील प्रदूषण रोखणे, पूर नियंत्रित करणे, घनकचरा व्यस्थापन, हायड्रोलीक उपचार, माहिम खाडीपरिसरात छोटे धरण किंवा बंधारे बांधणे, जपानी तंत्रज्ञान वापरून बोगदा बांधणे, नदी प्रवाह बारमाही करणे, कृत्रिम तलाव, बंधारे उभारणे, नदी परिसर सुशोभित करणे, कृत्रिम जंगल निर्माण करण्यात येणार आहे. तसेच, हॉटेल्स निर्माण करणे, जलक्रीडा प्रकार, जल वाहतुल सुरू करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here