नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंहचे सहकारी संजय सिंह यांची नव्या अध्यक्षच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
यानंतर कुस्तीपट्टू साक्षी मलिक यांनी कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, जर बृजभूषण शरण सिंह सारखे लोक महासंघात असतील तर त्या कुस्ती सोडण्याचा निर्णय घेत आहेत.
माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात साक्षी मलिक यांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. ज्यावरुन साक्षी मलिक यांच्यासह बजरंग पुनिया, विनेश फोगाट सारखे अनेक कुस्तीपट्टूंनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन पुकारलं होतं.
महाराष्ट्रातील नेत्यांकडून संताप…
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड…
खरंतर हा ‘देशाचा अपमान’ आहे!
देशाच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला नाईलाजास्तव व्यवस्थेपुढे गुढघे टेकावे लागले आहेत. देशाला पदक मिळवून देणारी मुलगी आजही आपल्या हक्कांसाठी भांडतेय आणि तिने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे उपराष्ट्रपती जगदिप धनखर ‘जाट’ आहेत. त्यांची मिमिक्री केल्याने ‘जाट’ समाजाचा अपमान झाला असं बोललं जातं. दुसरीकडे साक्षी मलिक पण ‘जाट’ आहे.लैंगिक शोषणाविरूद्ध या खेळाडूने रस्त्यांवर उतरून न्यायाची मागणी केली,परंतु तिला अद्याप न्याय मिळालेला नाही, मग हा ‘जाट’ समाजाचा अपमान नाही का?
नरेंद्र जिचकर
एखाद्या खेळाडूसाठी त्याचा खेळ सोडून देणे म्हणजे शरिरातून श्वास निघून जाण्यासारखे आहे…!
देशासाठी पदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने रडत रडत आज कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला .
देशासाठी पदक मिळवण्याऱ्यांची अशाप्रकारचे अवहेलना करने हा देशाचा अपमान नाही काय?