@maharashtracity

मुंबईत अग्निस्त्र सुरूच

मुंबई: मुंबईत (Mumbai) सध्या अग्निसत्र सुरूच आहे. २२ जानेवारी रोजी ताडदेव येथे व २६ जानेवारी रोजी साकिनाका येथे जैन सोसायटी येथे गॅस गळती होऊन आग लागल्याच्या घटना ताज्या असतानाच, भेंडी बाजार (Bhendi Bazar) येथील ख्वाजा महल या चार मजली इमारतीमध्ये वीज मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला होता. जवळजवळ ५० – ६० रहिवाशांना वेळीच इमारतीमधून सुखरूप बाहेर काढल्याने ते बचावले. अन्यथा अनर्थ ओढवला असता.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire fighter) जवानांनी तात्काळ घटना धाव घेऊन फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर एका तासात नियंत्रण मिळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here