@maharashtracity

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आदेश

मुंबई: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविदयालये दिनांक २० ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. (State allowed to reopen colleges form October 20)

ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यार्थी – विद्यार्थीनी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. तर ज्यांनी लस घेतलेली नाही अशांसाठी विद्यापीठाने संस्था प्रामुखाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे असे आदेश देण्यात आले.

मात्र मुंबईत वाहतुकीचे मुख्य साधन असलेल्या लोकल ट्रेन प्रवासाची परवानगी मिळणे आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.

महाविद्यालये पूर्णपणे की ५० टक्के क्षमतेने सुरु करावे यावर स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. तसेच त्या महानगर पालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांच्याशी कोविड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव बाबी विचारात घेऊन महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचार करावा असे हि सुचविण्यात आले.

याबाबत महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात यावी, असेही सामंत यांनी यावेळी सुचवले. वसतीगृहे टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत संचालक उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

विद्यार्थी आणि पालक यांनी सुद्धा काविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचे पालन करुन लसीकरण करावे, असे आवाहनही सामंत (Minister Uday Samant) यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here