महाड: विवाहितेवर हुंड्यासाठी गेली दहा वर्षे अत्याचार करणाऱ्या सासरच्या लोकांविरोधात पिडीत महिलेने २०२० मध्ये तक्रार केली होती. त्यानुसार महाड शहर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेचा विनेश सुदाम गायकवाड रा. काकरतळे याच्याशी १३ मार्च २०१० रोजी बौद्ध धर्म रितीरीवाजाप्रमाणे विवाह झाला होता. दरम्यान, नवरदेवाला मुलीच्या वडिलांनी सोन्याची चैन, ब्रेसलेट आणि सोन्याचे बिस्कीट दिले होते. मात्र ठरल्याप्रमाणे पन्नास हजार रुपये देण्यासाठी यातील पती व साधना सुदाम गायकवाड, विद्या संतोष जाधव, संतोष जाधव यांनी पिडीत महिलेच्या वडिलांकडे तगादा लावला होता. तसेच मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.
आरोपी संतोष जाधव याने पिडीत महिलेशी गैरवर्तन करुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. या विरोधात या विवाहित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर दि ३ फेब्रुवारी २०२२ रोजी महाड शहर पोलिस (Mahad Police) ठाण्यात आरोपी विरोधात भादवी कलम ४९८ अ, ३५४ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.